संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं राज्य कसं चालवायचं – नवनीत राणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

मुंबई – अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊ असे राणा यांनी निघण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं की राज्य कसं चालवायचं. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष यशस्वीपणे राज्य चालवून दाखवलं. त्यांनी विरोधकांवर अशी कारवाई केली नाही. सत्तेचा गैरवापर केला नाही. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी मला नैतिकता शिकवू नये. बाळासाहेबांची नैतिकता हे विसरले. आम्ही लढणारे लोक आहोत, घाबरणारे नाही’, असे टीकेची बाण त्यांनी सोडले.

त्याचबरोबर ‘लॉक-अप ते तुरुंगात जाईपर्यंत महिला म्हणून माझ्यासोबत जे घडलं त्याची माहिती मी दिल्लीतील नेत्यांना देणार आहे. तसंच ‘बीस फूट गाढ देंगे’ अशी भाषा करणाऱ्यांविरोधातही दिल्लीत तक्रार नोंदवणार आहे,’ असं नवनीत राणा म्हणाल्या.

महत्त्वाचे म्हणजे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना त्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. माध्यमांशी बोलल्याने राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केलं आहे, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं. त्यावर ‘आम्ही कुठल्याही अटींचं उल्लंघन केलेलं नाही. न्यायालयाने दाखल गुन्ह्यासंदंर्भात बोलणं टाळायला सांगितलं होतं. त्यावर आम्ही कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण माझ्यासोबत जे झालं ते बोलणं माझा अधिकार आहे’, असं नवनीत राणा म्हणाल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami