संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री रहावे
शिवसैनिकांचे एकविरा देवीला साकडे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मावळ – उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहावे व सध्याची राजकीय अस्थिरता निघून जावी. यासाठी ठाकरे परिवाराच्या आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीला आज शिवसैनिकांनी साकडे घातले. शिवसेना कोणाची? सध्या यावर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेवर दावा करत आहे; तर उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये आता एकीकडे शिंदे समर्थक शिंदेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ देखील कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.ठाकरे परिवाराची कुलदैवत असलेल्या मावळातील एकविरा मंदिरात आज शिवसेनेच्यावतीने देवीकडे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणून राहावे यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी कार्यकार्यत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami