संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

उध्दव ठाकरेेंनी निवडणुकीला पुढे जाण्याची तयारी दाखवावी- शरद पवार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद- केेंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्हआणि पक्षाचे नाव गोठविण्याचा तात्पुरता आदेश काल रात्री जाहीर केला. आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेेसर्वा शरद पवार यांनीही यावर आपले मत व्यक्त केले आहे. पवार म्हणाले की, आता चिन्ह असो किंवा नसो पण उद्धव ठाकरेंनी निवडणुकांना पुढे जाण्याची तयारी दाखवली पाहिजे. कारण मीही वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढलो आहे. या निर्णयामुळे शिवसेना तर अजिबात संपणार नाही, मात्र ती अजून जोमाने उभी राहील, असेही पवार म्हणाले.

शरद पवार आज औरंगाबाद दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे चिन्ह आणि नावावर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली. पवार म्हणाले की, निर्णय हे गुणवत्तेवरून घेतले जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असे काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो आणि ते घडले. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरे जायचे असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असे सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो उध्दव ठाकरेेंनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. मी स्वत: पहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर लढलो होतो. दुसरी निवडणूक ही गाय-वासरू या चिन्हावर लढलोे. तिसरी निवडणुकीत चिन्ह चरखा होते आणि चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो. आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: लढलो आहे. त्याचा काही तोटा होत नाही, तर लोक ठरवत असतात कोणाला निवडून द्यायचे.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील. आयोगाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीवरही परिणाम होण्याचे काहीच कारण नाही. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. हे कायम एकत्र राहतील, यात काहीच शंका नाही. आता जी पोटनिवडणूक आहे त्या निवडणुकीला काँग्रेसने पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला असल्याचे पवारांनी यावेळी म्हटले. दोन्ही गटांना नवीन चिन्ह आणि नवीन नाव ठरवायचे आहे यावर बोलताना शरद पवार यांनी नावाबाबत मी कोण सांगणार, ते उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्या शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असेही नाव होऊ शकते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही शिवसेनेवर हा अन्याय आहे. चिन्ह गोठवल्याने पक्ष संपत नाही, असे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami