लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाच्या प्रचारासाठी राज्यात प्रचार सभा घेत आहेत. यावेळी सभेत असे दृश्य दिसले की ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. उन्नावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क एका भाजपा नेत्याचे वाकून दर्शन घेतल्याचे सभेत दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
उन्नावमध्ये रॅलीच्या मंचावर पोहोचताच भाजपाचे उन्नाव जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी रामाची मूर्ती पंतप्रधानांना अर्पण केली. यावेळी अवधेश कटियार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करत दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना थांबवत मोदींनी स्वतः वाकून अवधेश कटियार यांच्या पायाला स्पर्श केला. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.