संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

उपमहासंचालकांनी छळले! समीर वानखेडेंची एनसीबीविरोधात तक्रार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ज्येष्ठ आयपीएस अधिकारी व एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी माझा छळ केला, अशी तक्रार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. त्यानंतर आयोगाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वानखेडेंवर कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. आर्यन खान प्रकरणात त्रुटी आढळल्याचा अहवाल दक्षता आयोगाने दिला आहे. त्यामुळे वानखेडे आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले. त्यानंतर त्यांचा धर्म आणि जातीचा मुद्दाही चर्चेत आला. परंतु जात पडताळणी समितीने वानखेडेंना क्लीनचीट दिली. त्यानंतर ५ सप्टेंबरला समीर वानखेडे यांनी ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे लेखी तक्रार दिली. त्यात त्यांनी सिंग यांनी काही साक्षीदारांना मारहाण केली. वानखेडे यांच्या चौकशीची विशिष्ट माहिती काही प्रसार माध्यमांना दिली. वानखेडे व त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची विशिष्ट माहिती ठराविक माध्यमांना दिली, असे आरोप वानखेडे यांनी सिंग यांच्यावर केले आहेत. त्यानंतर मंगळवारी आर्यन खान प्रकरणात त्रुटी आढळल्याचा अहवाल दक्षता आयोगाने दिला. त्यामुळे समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस आयोगाने केली आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करू नये, असे निर्देश देत कारवाईला स्थगिती दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाच्या दक्षता विभागाचे महासंचालक आणि एनसीबीचे महासंचालक यांना अनुसूचित जाती आयोगाने त्यासंबंधीचे पत्र पाठवले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami