संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

उपमुख्यमंत्र्यांच्या समोर तरूण संतापले! पोलीस भरती झाली पाहिजेच्या घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड:- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. परंतु या कार्यक्रमात तरूणांनी त्यांना घेण्याचा प्रयत्न केला.याप्रसंगी तरुणांनी पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी तरुणांनी उपस्थिती केला. पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना भेटले. पण काहीही न बोलताच ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळीही प्राध्यापक भरती झालीच पाहिजे, विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली होती. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, की आमच्या सरकारने दोन महिन्यांत ४५० निर्णय घेतले. आम्ही तुम्हालाही जे पाहिजे ते देणार आहोत. जी मंजूर पदे आहेत, ती भरली जातील. दरम्यान नांदेडमधील या घटनेवर अजित पवार शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

ते म्हणतात की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोकरी मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर लाढीचार्ज करण्यात आला. अरे तो बेकार आहे, नोकरी मागायला जाणार ना. आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी मला पण सकाळपासून मुले भेटली आणि म्हणाली की आमच्या नोकरीच काय. आम्ही पोलीस भरती, शिक्षक भरती काढल्या होत्या. दुर्दैवाने शिक्षक भरतीत भ्रष्टाचार झाल्याने ती थांबवावी लागली. मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीच्या घोषणा दिल्या जातात. मात्र अद्याप कोणीही भरती झाली नसल्याने तरुणांना मध्ये असंतोष पहायला मिळत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami