हैदराबाद : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि वाय.एस.आर.तेलंगणा पक्षाच्या प्रमुख शर्मिला रेड्डी यांना मध्यरात्री अटक केली. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.शुक्रवारपासून प्रजाप्रस्थानम पदयात्रेला परवानगी नाकारल्यामुऴे टीआरएस सरकारच्या विरोधात त्यांनी बेमुदत उपोषण पुकारले. अन्न आणि पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली.
शर्मिला रेड्डी यांनी काही महिन्यांपूर्वी वाय.एस.आर तेलंगणा काँग्रेस पक्षाची स्थापना केली.त्यानंतर तेलंगणामध्ये आपल्या पक्षाचा जम बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे टीआरएस सरकार कशाप्रकारे नागरिकांना न्याय देत नाही किंवा त्यांची धोरणे जनविरोधात आहेत.हे दाखवण्यासाठी रेड्डी यांची तेलंगणामध्ये पदयात्रा काढली.3 हजार किमी यात्रा पूर्ण झाली असून पुढील पदयात्रेसाठी परवानगी नाकारल्यामुळे रेड्डी यांनी टीआरएस सरकारविरोधात उपोषण पुकारले. त्यामुळे प्रकृतीत बिघाड होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी शर्मिला यांचा रक्तदाब आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी अत्यंत चिंताजनक असल्याचे अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. शर्मिला यांचे उपोषण सुरु राहिले तर त्यांची किडनी निकामी होऊ शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान,शर्मिला रेड्डी यांच्या आई विजयम्मा म्हणाल्या की, ही लोकशाही आहे का? याआधी कोणत्याही सरकारने आक्षेप घेतला नाही. चंद्राबाबू नायडू, वायएस राजशेखर रेड्डी, वायएस जगन, बंदी संजय कुमार, राहुल गांधी असोत यापूर्वी अनेक नेत्यांनी पदयात्रा केली आहे. वायएस शर्मिला यांची ही दुसरी पदयात्रा आहे. सरकारने संजय आणि राहुल गांधी यांना पदयात्रेला जाण्याची परवानगी दिली आहे, मग शर्मिला यांना परवानगी का दिली जात नाही? असा , सवाल त्यांनी केला आहे.