संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

उरणहून बेपत्ता झालेला विशाल झांसीत सापडला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उरण – नौदल अधिकारी विशाल महेश कुमार (22) हा तरुण उरणहून बेपत्ता झाला होता. तब्बल 12 दिवसानंतर तो झांसी येथे सापडला आहे. यामुळे कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विशालला गेल्या 12 दिवसात घडलेल्या घटनांबाबत काहीही आठवत नसल्याने नौदलाच्या अधिकार्‍यांनी त्याला उपचारासाठी मेरठ येथील दवाखान्यात दाखल केले असल्याची माहिती तपास अधिकारी अनिरुद्ध गिजे यांनी दिली.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील धपरौली गावातील विशाल महेश कुमार (22) हा जवान 19 महिन्यांपूर्वी उरण-करंजा येथील नौदलाच्या सेवेत दाखल झाला होता. नौदल शस्त्रागारातील आयएनए-अभिमन्युमध्ये सेफ (स्वयंपाकी) म्हणून काम करणारा जवान अधिकारी गेल्या 3 नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाला होता. यानंतर नौदल अधिकार्‍यांनी विशालच्या आईवडीलांना तत्काळ बोलावून घेऊन माहिती दिली होती. त्यानंतर विशालचे वडिल महेश कुमार यांनी 6 नोव्हेंबर रोजी मिसिंगची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. उरणच्या विमला तलावात 3 नोव्हेंबर रोजी सकाळी स्विमिंगसाठी आलेल्या विशालचे शेवटचे मोबाईल लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन दाखविण्यात आले होते. या प्रकरणी उरण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. मात्र विशालचा मोबाईल फोन बंद असल्याने बेपत्ता विशालचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. तब्बल 12 दिवसांनंतर म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी विशालला आपण झासीमध्ये असल्याची जाणीव झाली. फाटके मळके आणि अशक्त अवस्थेत असलेल्या विशालला उरणपासुन झासीपर्यंत कसे पोहोचलो हे आठवेना. अंगावरील छिन्नविछिन्न झालेल्या कपड्यातील कप्प्यात नौदलाचे ओळखपत्र सापडले. या ओळखपत्राच्या आधारावर आणि नागरिकांच्या मदतीने 14 नोव्हेंबर रोजी म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी दरमजल करून धपरौली गावातील घर गाठले. घरच्यांनी तत्काळ उरण पोलीस, नौदल अधिकार्‍यांना याची माहिती दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami