मुंबई- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस 6ची विजेती उर्वशी ढोलकियाच्या कारला स्कूल बसने धडक दिल्याची घटना काल घडली. त्यात त्याला गंभीर दुखापत झालेली नाही.मात्र उर्वशीच्या कारचे नुकसान झाले.
शूटिंगसाठी उर्वशी मीरा रोड येथील सेटवर जात असताना काशिमीरा भागात स्कूल बसने उर्वशीच्या कारला धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे.स्कूल बस असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करता उर्वशीने कोणतीही कायदेशीर तक्रार नोंदवलेली नाही. उर्वशीचा गंभीर दुखापत झालेली नसून डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गंभीर दुखापत झाली नसल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.