संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

उल्हासनगरमध्ये मालमत्ता कराचे तब्बल १९३ धनादेश वठलेच नाहीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उल्हासनगर – यंदा उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ता कराचे तब्बल १९३ जणांनी चेक बाऊन्स म्हणजेच ते वठले नसल्याची माहिती समोर आली आहे. आता या १९३ जणांवर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. धनादेश वठले नसल्याने आता या सर्वांना १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिकेत मालमत्ता कराची ४५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने मध्यंतरीच्या काळात कर बुडवणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर आता या करबुडव्यांनी महापालिकेला चुना लावण्याची एक नवी शक्कल लढवली आहे. हे करबुडवे मालमत्ता कराच्या रक्कमेचा चेक देऊन कर भरल्याची पावती घेतात. मात्र प्रत्यक्षात बँकेत बॅलन्सच नसल्याने हे चेक बाऊन्स होतात. अशाप्रकारे तब्बल १९३ जणांनी चेक बाऊन्स केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे हे करबुडवे आता तरी मालमत्ता कर भरतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami