उस्मानाबाद : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी तेथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन अक्षरश: त्याठिकाणी पंचनामा केला आहे.शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषध डॉक्टरांनी लिहून दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
शासकीय रुग्णालयात रुग्ण तपासासाठी आल्यानंतर त्यांना खाजगी मेडिकलच रस्ता दाखवला जातो. असे आरोप झाल्यानंतर स्वत: डॉ.भारती पवार चिठ्ठी हातात घेऊन शासकीय मेडिकलसमोर औषधे घेण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी त्यांनी चिठ्ठी दिली तेव्हा ती सर्व औषधे संपली असून ती बाहेरून घेण्याचा सल्ला भारती यांना देण्यात आला.यानंतर संतापलेल्या भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक लावली. याशिवाय डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश देत ऑडिट करण्याचे आदेश भारती पवार यांनी दिले.