संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

ऊसाच्या ट्रॅक्टरला टँकरची मोठी धडक
एकाचा मृत्यू,१२ जखमी,७ वाहने खाक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लातूर- एका डिझेल टँकरने ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती.ही आग रस्त्यावरील इतर वाहनांमध्येही पसरली. जवळपास ७ वाहने या भीषण अपघातामध्ये जळून खाक झाली.तर एकाचा होरपळून मृत्यू झाला.तर १२ जण जखमी झाले.हा अपघात लातूर-नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी दरम्यान घडला.
या दुर्घटनेत खासगी कार, डिझेल, टँकर याच्यासह एसटी बसच आगीत जळून खाक झाली.या अपघातामुळे लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.काल बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास इंधनाने भरलेला टँकर लातूरहून अहमदपूरकडे जात होता.मात्र वाटेतच या टँकरची आणि उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक झाली. या धडकेनंतर काही वेळातच टँकर तर पेटला. तसेच आजूबाजूने येणाऱ्या दोन कारलाही आगीने आपल्या कवेच घेतले.त्यानंतर काही कळायच्या आत भातखेड पाटीजवळ आगडोंब उसळला.एसटी आणि कारमधील प्रवाशांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. पण काही जण गंभीर जखमी झाले. तर टँकरच्या चालकाच्या पायाला या अपघातात जबर जखम झाली.पण चालकाचा सहकारी मात्र आगीत जळून मरण पावला.या अपघातात जळून खाक झालेली एसटी बस ही नांदेडहून लातूरकडे जात होती.या अपघातात सात वाहने एकाच वेळी पेटल्यानंतर खळबळ उडाली होती.या अपघातामुळे लातूर-नांदेड महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दीड तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले.त्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य केले. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami