संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

ऊसाला एक रकमी एफआरपीसाठी पुण्यात स्वाभिमानी संघटना आक्रमक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज साखर संकुल पुणे येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात आला. दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी एफआरपी करा, या प्रमुख मागणीसाठी व अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पुण्यातील साखर कार्यलयावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव एकाच टप्प्यामध्ये मिळावा आणि साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचा काटा मारला जातो.त्यामुळे ही काटेमारी थांबवावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी हातात आसू़ड घेत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चाला जवळपास 2 ते 3 हजार शेतकरी पुण्यातल्या रस्त्यावर उतरले होत. अलका चौक ते साखर संकुल असा धडक मोर्चा स्वाभिमानीकडून काढण्यात आला.यावेळी राजू शेट्टी म्हणाले की,सरकराने आंदोलनाची दखल घ्यावी,अन्यथा सरकारला किंमत चुकवावी लागेल.यावेळी पंजा मारल्याशिवाय वाघ म्हणणार नसाल तर पंजा मारुन दाखवतो. दरम्यान, राज्यव्यापी धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी साताऱ्यातील शेतकरी पुण्याकडे जात असताना आनेवाडी टोल नाक्यावर शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. टोल भरा मगच गाडी सोडणार असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी टोल नाके बंद पाडले. एकनाथ शिंदेच्या मेळाव्यास जाताना टोल माफ केला जातो मग शेतकऱ्यांच्या मेळाव्याला जाताना टोल माफ का केला जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे काहीकाळ आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami