संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

एअर इंडियाचा कायापालट होणार, सेवा हायटेक बनवणार; टाटा सन्सच्या चंद्रशेखरन यांची ग्वाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – एअर इंडियाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय टाटा उद्योग समूहाने घेतला आहे. टाटा समूहात समावेश झालेल्या एअर इंडियाला आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवण्यात येणार आहे. विमानांमध्ये सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. नवीन विमाने खरेदी केली जाणार आहेत. जगातील अत्याधुनिक आणि हायटेक अशी ही विमानसेवा बनवली जाणार आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली.

तोट्यात असलेल्या एअर इंडियाचे केंद्र सरकारने खाजगीकरण केले. त्यात सर्वाधिक बोलीमुळे ७० वर्षानंतर एअर इंडियाचा टाटा उद्योग समूहात समावेश झाला. एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर टाटा समूहाने या विमान सेवेचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या एअर इंडियामध्ये आमूलाग्र बदल केला जाणार आहे. ही सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून अत्याधुनिक केली जाणार आहे. जगातील सर्वश्रेष्ठ नामांकित विमान सेवा म्हणून ती नावारूपाला आणली जाणार आहे. जगातील सर्व देशांना या विमान सेवेने जोडले जाणार आहे. एअर इंडिया हा टाटा उद्योग समूहाचा भाग बनला आहे.

१३० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी टाटा समूहाला मिळाली आहे. ताज हॉटेल, तनिष्क, टाटा मीठ आणि जग्वार लँड रोवर या ब्रँडशी ६० कोटी भारतीय जोडले आहेत. हे सर्व लक्षात घेऊन टाटा उद्योग समूहाने एअर इंडियाच्या सेवेत अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानांमध्ये सुधारणा करून ती अत्याधुनिक केली जाणार आहेत. तिच्या इतर सेवांचेही अत्याधुनिकीकरण केले जाईल. आम्ही मोठ्या प्रमाणात नवीन विमाने खरेदी करणार आहोत. याशिवाय एअर इंडियाचा आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी काम करणार आहोत, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami