स्टॉकहोम – एअर इंडियाच्या नेवार्क(यूएस) ते दिल्ली या प्रवाश्यांनी भरलेल्या विमानाने स्वीडनच्या स्टॉकहोम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान तातडीने विमानतळावर आणण्यात आले. यावेळी विमानतळावर मोठ्या प्रमाणात मदत पुरवण्यात आली. या विमानात सुमारे ३०० प्रवाशी होते. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
एआय १०६ या विमानाने अमेरिकेतील नेवार्क येथून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. विमानाच्या इंजिन-२ मधील तेल झपाट्याने कमी होत असल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. तपासणी केली असता दुसऱ्या इंजिनमधून तेल गळती होत असल्याचे आढळून आले. हे तेल सुमारे साडेसात लिटर एवढे कमी झाले होते, त्यानंतर विमान इमर्जन्सी लँड करण्याचा निर्णय घेण्यात आला.