अबू धाबी – अबू धाबीहून कोझिकोडेला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील एका इंजिनमध्ये ज्वाला दिसल्यानंतर अबुधाबी विमानतळावर परत आले. एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट 348 च्या पायलटच्या लक्षात ही गोष्ट आली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये एकूण 184 प्रवासी होते. तेव्हा एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान सुरक्षितपणे खाली उतरले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एअर इंडिया एक्स्प्रेस विमान समुद्रसपाटीपासून 1,000 फूट उंचीवर गेल्यावर एका इंजिनमध्ये ज्वाला आढळून आल्या. टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे विमान अबुधाबी विमानतळावर परतले.