नवी दिल्ली:- एअर एशिया विमानसेवेला डीजीसीएने दंड ठोठावला आहे. डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर एशियाला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह एअर एशियाच्या 8 नामांकित परीक्षकांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एअर एशियाने वैमानिकांच्या प्रावीण्य तपासणी तसेच इंस्ट्रूमेंट रेटिंग चेक (जी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेची आवश्यकता आहे) या दरम्यान वैमानिकांच्या दृष्टीने अनिवार्य सराव कार्यक्रम आयोजित न केल्याबद्दल डीजीसीएने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.याशिवाय, कर्तव्य बजावण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल प्रशिक्षण प्रमुखांना 3 महिन्यांच्या कालावधीसाठी पदावरून काढून टाकण्याचे आदेशही डीजीसीएने दिले आहेत.