मुंबई – भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपशब्द वापरल्याने राजकीय वातावरण अधिक गरम झाले आहे. संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोण किरीट सोमय्या आम्हाला माहित नाही.अशा *लोकांच्या बाबतीत शिवसेनेला अजिबात प्रश्न विचारू नये, कारण असे लोकं २०२४ नंतर देशात राहणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यानंतर किरीट सोमय्यांनी संजय राऊत इतके का घाबरले आहेत की, ते इतरांचा बाप काढत आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला. संजय राऊत एकदाच शिव्यांची डिक्शनरी देऊन टाका, असा पलटवार किरीट सोमय्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते. या प्रकरणी त्यांनी आज पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, सांताक्रुझ पोलिस स्टेशन जो गुन्हा दाखल झालेला आहे तो एक हास्यास्पद गुन्हा आहे. छगन भुजबळ यांची बेनामी मालमत्ता हे मी पाहण्यासाठी गेलो होतो. म्हणून हा गुन्हा आमच्यावरती दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्या मालमत्तेचा घोटाळा मी उघडकीस आणला होता, त्यानंतर ते दोन वर्ष जेलमध्ये गेले होते. त्याची मालमत्ता पाहिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत सुध्दा म्हणतात की किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा हे दोघेही जेलमध्ये जातील. परंतु मी जेलमध्ये जायला घाबरत नाही असं किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यांचा हिशोब द्यावा असेही आज किरीट सोमय्यांनी सांगितले. त्यानंतर ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आले त्या कंपनीला कंत्राट कसे देण्यात आले याचेदेखील उत्तर द्याव लागणार आहे. संजय राऊत यांनी ईडीला घेऊन जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या संदर्भात मी उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. माझ्याकडून कसलाही त्रास अन्वय किंवा नाईक कुटुंबियांना दिला जात नाही तसेच संजय राऊत एवढे घाबरले आहेत कि ते इतरांचा बाप काढत आहेत असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.