संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे विधान परिषद गटनेते

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदावर निवड करण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची आज घोषणा केली. तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात आले होते. आता त्यावर आज शिक्कामोर्तब झाला. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांची नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ खडसे यांचा राजकीय कारकिर्दीचा दांडगा अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने त्यांना ही मोठी सोपवली. विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या