संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

एकवेळ आईवरून शिवी चालेल पणमोदी-शहाबाबत सहन करणार नाही! चंद्रकात पाटलांचा असाही किस्सा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – ‘ काही दिवासांपूर्वी राजू शेट्टी हे एका केंद्रीय मंत्र्यांना भेटले त्यावेळी शेट्टीनी ‘दादांनी मला संपविले असे सांगितले. त्यावर त्या मंत्र्यानी ‘दादा कोणाला संपवत नाही. एकवेळ ते आई-वडिलांना शिव्या दिल्या तरी त्या सहन करतील, पण मोदीजी आणि शहांना शिव्या दिल्या तर ते कदापि सहन करणार नाहीत.त्यावेळी नशीब तुम्हाला पाडला, बाकी काही करणे त्याचा स्वभाव नाही.’’ असे त्या मंत्र्याने शेट्टी यांना सांगितल्याचा प्रसंग राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शहर भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी त्यांनी पुण्यातील कोथरूड मधून विधानसभा निवडणूक लढवण्यामागचे कारण स्पष्ट केले.तसेच त्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबाबत घडलेला हा केंद्रीय मंत्री आणि शिव्यांबाबतचा किस्सा सांगितला. यावेळी पाटील पुढे म्हणाले की,
‘दिल्लीत बसलेल्या नेत्यांनी मला मजा म्हणून कोथरूडमधून उमेदवारी दिलेली नाही. यामागे मोठे नियोजन होते. पण सत्ता गेल्याने ते अर्धवट राहिले आहे.आता सत्ता पुन्हा आली आहे हे मिशन पूर्ण करायचे आहे’ असे सांगत ‘माझ्यावर बाहेरचा आला म्हणून टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही,’ अशा शब्दात पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडच्या उमेदवारीबद्दल स्पष्टीकरण दिले.

आगामी महापालिका निवडणुका,पक्षांतर्गत वाद, महामंडळांवरील नियुक्त्या, सत्कारानिमित्त शहरात लावलेले अनधिकृत फ्लेक्स अशा सर्व विषयांवरही पाटील यांनी भाष्य केले. कोल्हापूरमधील चार पैकी कोणत्याही मतदारसंघातून मी निवडून येऊ शकतो असे सांगून पाटील म्हणाले, ‘‘अमित शहांनी सांगितले म्हणून मी कोथरूडला आलो.मला मेवा म्हणून ही उमेदवारी दिलेली नाही. हे पक्षाने दिलेले मोठे मिशन होते. पण सरकार गेल्याने ते अर्धवट राहिले आहे. २०१४, २०१९ ला राज्यात सरकार येण्यासाठी ज्या जागा कमी पडल्या त्या भरून काढण्याची ताकद पुणे आणि जिल्ह्यात आहे. त्यासाठीच मी पुण्यात आलो. त्यासाठी नीट कामाला लागा,भांडाभाडी करू नका.पाटील म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी मी आपले सरकार येणार असे मी कायम म्हणायचो. पण ४० जणांना बाहेर काढून सरकार तयार करणे सोपे नव्हते. अखेर ते झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami