जळगाव – राज्यभरात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर महिनाभरापुर्वी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय आता जळगाव महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आता कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नसल्याने शहरातील सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाची तिसरी लाट पसरली. यामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढायला सुरूवात झाली होती. शहरात एक हजारापर्यंत रूग्णांची संख्या वाढली होती. दोन आठवडे रूग्ण वाढले. त्याअनुषंगाने महापालिकेने १० जानेवारीपासून अभियांत्रिकी वसतिगृहात महाविद्यालयातील कोविड़ केअर सेंटर सुरू केले होते. गेल्या महिनाभरात कोविड सेंटरमध्ये ६०० रूग्ण दाखल झाले होते.
गेल्या महिनाभरात कोविड सेंटरमध्ये ६०० रूग्ण दाखल झाले. मात्र रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात येत होते. त्यामुळे सेंटरमध्ये रूग्णांची कमी झाली. यात रविवारी एकही रूग्ण नसल्याने महापालिका प्रशासनाने कोविड सेंटर सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल व्हायचे असेल अशा रूग्णांसाठी मोहाडी रूग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.