संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

एका रात्रीत जगभरात ख्याती पसरलेल्या ‘कच्चा बादाम’ गायकाचा पोलिसांकडून सत्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता – सोशल मीडियावर सध्या ज्या गाण्याने लक्षवधी चाहत्यांना वेड लावले आहे त्या ‘कच्चा बादाम’ गाण्याचा मूळ गायक भुबन बादायकर याला वेगवेगळ्या सेलिब्रेटींची दाद मिळाल्याचेही दिसून आले होते. पण आता त्याच्या या गाण्याने पोलिसांनाही वेड लावले आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालचे आयुक्त मनोज मालवीय यांनी भूबनचा विशेष सत्कार केला आहे. पश्चिम बंगालमधील कुरालगुजरी गावात राहणारा हा गायक आपल्या गावात भुईमुगाच्या शेंगांची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत आहे.

पश्चिम बंगालचे आयुक्त मनोज मालवीय यांनी भुबनला थेट पोलीस आयुक्तालयात बोलावून त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याने इतरांबरोबर असंख्य पोलिसांचीही मने जिंकली आहेत. सत्कारावेळी त्याने पोलिसांसमोर ते गाणे गायले आणि सर्वांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. ‘कच्चा बादाम’ हे गाणे मूळ बंगाली भाषेत असून या गाण्यावर इन्स्टा रील्स तयार करून ते व्हायरल केले जात आहेत. हे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत पोहचले आहे. त्याचे हे गाणे पाहून दूर दूरहून लोक त्याला भेटायला त्याच्या गावात येत आहेत. अनेकांनी त्याच्यासोबत व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड करायला सुरुवात केली आहे. शेंगदाण्याला पश्चिम बंगालमध्ये ‘कच्चा बादाम’ असे म्हटले जाते आणि भुबन हासुद्धा शेंगदाण्याची विक्री करतो. त्यामुळे तो बादाम…बादाम बादाम…कच्चा बादाम असे आपल्या शैलीत गायचा. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता तर टांझानियातील किली पॉल नावाचा एक तरुण सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ची नक्कल करताना दिसत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami