भंडारा : – शेताची मोक्का पाहणी करून विकास व छाननी शुल्क पावती देणे, तसेच रेखांकन मंजुरीसाठी अंतिम शिफारस पुढे पाठविण्यासाठी एक लाख दहा हजारांची लाच स्वीकारताना भांडारातील लाखांदूर नगरपंचायतीच्या अभियंत्यासह दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री केली.
स्थापत्य अभियंता गजानन मनोहर, कनिष्ठ लिपीक विजय राजेश्वर व खासगी वाहनचालक मुखरण लक्ष्मण देसाई अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. लाखांदूर येथील तक्रारदाराच्या मालकीची शेती असून त्यांना शेतीचे विकास व छाननी शुल्क पावती व रेखांकन मंजुरीसाठी शिफारस हवी करण्यात आली होती. त्यांनी या कामासाठी लाखांदूर नगरपंचायतशी संपर्क साधला. काम करून देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार नागपुर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. गुरुवारी रात्री तब्बल एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मध्यरात्री सुमारास दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले.