एनआयएचे काश्मीरमध्ये ११ ठिकाणी छापे, जमात-ए-इस्लामी विरोधात कारवाई

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

श्रीनगर – राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-काश्मीर पोलिसांसह बुधवारी काश्मीरमध्ये ११ ठिकाणी छापे टाकले. आजच्या कारवाईत श्रीनगर, बारामूला, पुलवामा, अवंतीपोरा, सोपोर, गंदरबल, बडगाम, बांदीपोरा, पुलगाम आणि शोपियामध्ये छापे टाकण्यात आल्या.

जम्मू-काश्मीरमध्ये मध्यंतरी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधित संघटनेच्या जमात-ए-इस्लामी विरोधात ही कारवाई करण्यात आली. या दहशतवादी संघटने दहशतवादी कृत्त्यांसाठी पैसे पुरवणेयाचा आरोप आहे. १०ऑक्टोबरला पण एनआईए ने १६ ठिकाणी छापेमारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुलगाम, बारामुला, श्रीनगर यी ठिकाणी दहशतवाद विरोधात कारवाई केली होती. देवसर येथील मोहम्मद अखराम बाबाचे घर आणि बाबापोरा येथील शबाना शाह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. मोहम्मद अखराम (६९) हा देवसर येथील रहिवासी आसून निवृत्त सरकारी कर्मचारी आहे. त्या जमात-ए-इस्लामी संबंधित असल्याचा म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हॉईस ऑफ हिंद’ मासिकाच्या प्रकाशना संबंधीत ही कारवाई करण्यात आली. टीआरएफ कमांडर सज्जाद गुल यांच्या घरावरही छापा टाकण्येत आला .पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी दबा धरुन बसल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे विविध गट जंगलात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुंछ राजौरी भागात ऑगस्ट महिन्यापासून एन्काऊंटर्स सुरु आहेत. तर, १४ ऑक्टोबरला दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आणखी चार जवानांना वीरमरण आले होते त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता.याच पार्शवभूमीवर हे छापे टाकण्यात आल्याचे समजते

Close Bitnami banner
Bitnami