संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

एनआयएने पुरावे लोकांसमोर मांडावे! प्रकाश आंबेडकरांकडून व्हिडोआ पोस्ट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- एनआयएने गुरुवारी महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफए) कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला ट्वीटरवर व्हिडोओ पोस्ट केला. त्यात आंबेडकरांनी सांगितले की, तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, या यंत्रणांनी कारवाईत देशविरोधी कारवायांबाबत काय पुरावे मिळाले हे आगामी 24 तासात लोकांसमोर मांडावे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लीम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो. असे असले तरी राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि आपण जे कागदपत्रे गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात लोकांसमोर मांडावे, तसे मांडले नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपाचा मुस्लीम विरोधी अजेंडा आहे. तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते, असेही आंबेडकरांनी नमूद केलं

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami