संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

एनडीटीव्हीमध्ये अदानी समूहाला
दोन संचालकपदे!नावे मागवली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ति समजल्या जाणार्‍या उद्योगपती गौतम अदानी यांनी पत्रकारिता क्षेत्राचा भाग असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातही शिरकाव केला आहे.अदानी समूहाच्या मीडिया कंपनीने नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड म्हणजेच म्हणजेच एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.त्यामुळे आता अदानी समूहाच्या कंपनीला एनडीटीव्हीमध्ये संचालक पदावर नियुक्तीसाठी आपली दोन नावे सुचवण्यास सांगितले आहे.अदानी कंपनीच्या हिस्सेदारीच्या बदल्यात एनडीटीव्हीने ही स्वेच्छेने ऑफर दिली आहे. याबाबतची माहिती शेअर बाजारांनाही कळविण्यात आली आहे.
या संचालकपदाच्या ऑफर नंतर अदानी समूहाला आणखी २६ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी खुली ऑफर दिली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविकता,एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांच्याशी झालेल्या करारानुसार एनडीटीव्हीतील २९.१८ टक्के भागीदारी अदानी समुहाने हस्तगत केली होती. अदानी मीडिया नेटवर्क लिमिटेडच्या मालकीची उपकंपनी,विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच व्हीसीपीएल हा टेकओव्हर करणार आहे.अप्रत्यक्षरीत्या ही डील अदानी समुहासाठी करण्यात येणार आहे. दरम्यान,एनडीटीव्हीच्या संचालक मंडळाची ९ डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीला अदानी इंटरप्रायझेस लिमिटेडची अप्रत्यक्ष उपकंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला निमंत्रित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याच कंपनीची एनडीटीव्हीमध्ये २९.१८ टक्के भागीदारी आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami