मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना ही परीक्षा देता येणार आहे. २१, २२ आणि २३ जानेवारी २०२३ रोजी राज्यातील ६ परीक्षा केंद्रांवर मुख्य परीक्षा होणार आहे. तिची माहिती आयोगाने वेबसाईटवर दिली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २९ ऑगस्ट २०२२ रोजी घेतली होती. तिचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या व मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाने वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. यातील पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा २१, २२ आणि २३ जानेवारीला घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर या ६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.