संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी संदीप पाटील x आशिष शेलार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते आशिष शेलार यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटीलसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यांमध्ये ही अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. माझा अर्थात शरद पवार गटाचा अर्ज 6 ऑक्टोबरला दाखल होणार, असे संदीप पाटील यांनी सांगितले आहे. यापूर्वी शेलार 2015 मध्ये उपाध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर 12 जानेवारी 2017 रोजी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami