मुंबई- एलआयसी ऑफ इंडियाने आपल्या वार्षिकी योजना एलआयसीच्या जीवन अक्षय (योजना क्र. 857) आणि नवीन जीवन शांती (योजना क्र. 858) यांच्याशी संबंधित वार्षिक दरात 1 फेब्रुवारी 2022 पासून बदल केले आहेत. सुधारीत वार्षिक दरांसह या योजनांची सुधारित आवृत्ती 1 फेब्रुवारी 2022 पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
नवीन जीवन शांतीच्या दोन्ही वार्षिकी पर्यायांच्या अंतर्गत ही वार्षिक रक्कम एलआयसीच्या वेबसाईटवर पुरविण्यात आलेल्या कॅलक्यूलेटरच्या माध्यमातून तसेच विविध एलआयसी अॅप्सच्या माध्यमातून मोजता येऊ शकेल. सुधारित वार्षिक दरांच्या जोडीला एलआयसीची जीवन अक्षय (योजना क्र. 857) इतर वितरण माध्यमांसह नवीन वितरण चॅनेल कॉमन पब्लिक सर्व्हिस सेेंटर्स मधूनही खरेदी करता येऊ शकेल. या योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पध्दतीने उपलब्ध आहेत.