संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

एसटीचे विलीनीकरण होणार का? उद्या होणार महत्वाचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यापासून संप पुकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात त्रीसदस्यीय समितीला १८ मार्चपर्यंत अहवल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच समितीने कोर्टात एसटी विलीनिकारानाबाबतचा अहवाल सदर केला आहे. याबाबतची सुनावली उद्या मुंबई उच्च न्यायालयात होत आहे. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस ठरणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचे उद्याच्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्यभरातून एसटी कामगार मोठ्या संखेने कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्या होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 12 आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्फत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी 12 आठवड्याची मुदत संपली होती. तरीही अहवाल तयार नव्हता. त्यानंतर कोर्टाने अंतिम मुदतवाढ १८ फेब्रुवारीपर्यंत दिली होती. राज्य सरकारकडून एसटी विलिनीकरणावरील अहवाल न्यायालयापुढे ठेवण्यात आला आहे. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ खात्याचे सचिव आणि परिवहन खात्याचे सचिव यांच्या समितीकडून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्रिसदस्यीय समितीने एसटीच्या 28 कामगार संघटनांकडून विलीनीकरणाबाबत व्यक्तिगत अभिप्राय मागविला होता. तर अन्य काही राज्यातील एसटीच्या विलीकरणाचा निर्णय कोणत्या धोरणात घेण्यात आला आहे. याचा तपशीलवार अभ्यास केला असल्याची माहिती मिळत आहे.

संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही एसटीचे विलीनीकरण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संप ताणून संपूर्ण 12 आठवडे एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत. राज्यभरात सुरू असलेल्या संपामुळे एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई सुरुच ठेवली असून त्यांच्या राहत्या शासकीय घरानाही एसटी प्रशासनाने नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली आहे.उद्या सुनावणीकडे संपूर्ण एसटी कर्मचारी आशेने पाहत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami