*विभाग नियंत्रकांना जागेची माहिती घेण्याच्या सूचना
मुंबई – एसटीची सेवा गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी या ब्रीद वाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विसरलेली आहे.पण आता याच एसटीच्या शहराच्या आणि एसटी महामंडळाचे मुख्यालय असलेल्या मध्यवर्ती अशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस वसाहती उभारल्या जाणार आहेत.एसटी महामंडळाने याबाबत राष्ट्रीय परिवहन मंडळाच्या सर्व जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत.त्यासाठी महामंडळाकडून राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र लिहून जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणा-या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, असे महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे.
एसटी महामंडळ आणि राज्याचे मुख्य सचिव यांची याबाबत १३ सप्टेंबर रोजी बैठक झाली होती. यावेळी एसटी महामंडळाच्या रिक्त जागेत पोलिस वसाहती बांधण्याबाबत विचार झाला होता.मुख्य सचिवांनी याबाबतचा आढावा घेतला होता.त्यानुसार आता एसटी महामंडळाच्या जागेत पोलिस वसाहती बांधण्यात येणार आहेत.
महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणा-या जागेत पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. आपल्या विभागाच्या रिक्त जागेचा एस. टी. महामंडळाच्या प्रयोजनार्थ आणि भविष्यातील वाहतुकीची निकड लक्षात घेऊन राखीव ठेवण्यात याव्यात, तसेच उर्वरित रिक्त जागा पोलिस वसाहती बांधण्यासाठी उपलब्ध करून देता येईल किंवा कसे, याबाबत माहिती देण्यात यावी, असे राज्य परिवहन महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे.अनेक वर्षांपासून पोलिस वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्यामुळे एसटी महामंडळाच्या जागेत जर पोलिस वसाहती उभारण्यात आल्या तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय सतत तोट्यात असलेल्या एसटी महामंडळालादेखील त्याचा फायदा होणार आहे.पोलिस वसाहती या शहराच्या मध्यभागी असल्यास पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे.