संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

एसटीत चालकांपाठोपाठ आता कंत्राटी वाहकांचीही भरती करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विलीनीकरण मागणीसाठी मागील तीन महिन्यांपासून संपाचे हत्यार उपसले आहे. विविध प्रकारचे पर्याय वापरूनही आंदोलन मागे घेण्यास आंदोलक तयार नाहीत. त्यामुळे एसटी प्रशासनाने कंत्राटी चालक भरती सुरू केली आहे.पण संपामध्ये चालकांबरोबर वाहकही मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याने आता महामंडळाने काही महिन्यांसाठी तात्पुरती कंत्राटी पद्धतीने वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.एसटीला इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन पुरवण्याचे कंत्राट असलेल्या ट्रायमॅक्स कंपनीला हे भरती प्रक्रियेचे काम दिले आहे.

एसटी महामंडळात एकूण ८२ हजार ४८९ कर्मचारी असून २७ हजार ९८५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अद्यापही ५४ हजार ५९४ कर्मचारी संपात सहभागी आहेत.आतापर्यंत ४ हजार ५०७ चालक हजर झाले असून २५ हजार ८३ चालक संपात सहभागी आहेत. तसेच ४ हजार ६३० वाहक कर्तव्यावर असून, २० हजार २८० वाहक संपात सहभागी आहेत. कामावर हजर झालेल्यांमध्ये सर्वाधिक प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारी आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात चालक, वाहक सेवेत आल्याशिवाय एसटी पूर्णपणे सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे महामंडळाने मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नुकतीच ८०० कंत्राटी चालकांची भरती केली. मात्र, एसटीचे चालकच परतत नसल्याने या संख्येतही वाढ केली जाणार असून त्यासाठी या आठवडय़ात निविदाही काढण्यात येणार आहे. कंत्राटी चालक भरती करतानाच संपकरी वाहकही परतण्याचे प्रमाण कमी असल्याने एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami