संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

एसटी कार-बसचा अपघात चौघे ठार! १३ गंभीर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

यवतमाळ – महाराष्ट्रात रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अमरावतीवरून लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर रस्त्यातच काळाने घाला घातला. त्यांच्या कारला एका भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत.
अमरावतीवरून यवतमाळला येणाऱ्या एसटी ( क्रमांक, एमएच 06 एस 8826) आणि टीयगो कार ( क्रमांक, एमएच 29 बीसी 9173) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राधेश्याम इंगोले (रा. यवतमाळ ), रजनी इंगोले (रा. यवतमाळ ), वैष्णवी गावंडे ( रा. वाशिम ) आणि सारीका चौधरी ( रा. पुसद यवतमाळ ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी ( रा. पुसद ), प्रमोद पांडुरंग चौधरी, सारीका संतोष गावंडे आणि संतोष गावडे अशी जखमींची नावे आहेत.
रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. लग्न सोहळ्यावरून परत येत असताना काळाने घाला घातलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी आणि इंगोले कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे 3 डिसेंबर रोजी अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे लग्न होते. या लग्नसोहळा अटोपून आज सकाळी यवतमाळकडे परत येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बसने कारला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami