संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

एसटी बसची दुचाकीला जबर धडक रुग्णालय कर्मचार्‍यासह दोघे ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात नादुरुस्त बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.मोताळा तालुक्यात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातामध्ये दोघांना आपले हात गमवावे लागले होते.या घटनेला काही कालावधी उलटत नाही तोच बोथा घाटात एस.टी.महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली आहे.या धडकेत एकजण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
या अपघातामध्ये ५५ वर्षीय गजानन शेळके हे जागीच ठार झाले तर प्रकाश जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.गजानन शेळके हे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कक्षसेवक म्हणून कार्यरत आहेत.ते दुचाकीने कोलवड येथील आपले मित्र प्रकाश तोताराम जाधव यांच्यासोबत शेगावकडे निघाले असताना मोर्शी ते बुलढाणा या एसटी बसने ज्ञानगंगा अभ्यारण्यातील देव्हारी फाट्याजवळ दोघांना जबर धडक दिली.या धडकेत गजानन शेळके हे जागीच ठार झाले तर त्यांच्या दुचाकीवर असलेल्या प्रकाश जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बस चालकांनी गाडी चालवताना काळजी घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami