संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

एसटी बस-खासगी ट्रॅव्हल्सचा नागपूर उमरेड रस्त्यावर अपघात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- नागपूर उमरेड रस्त्यावर एसटी बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपघातात 18 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.एसटी बस नागपूरवरून उमरेडच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला.

नागपूर उमरेड महामार्गावरील पाचगाव बस स्टॉप जवळ बस आणि ट्रॅव्हल्स चा अपघात होऊन जवळपास १७ जण जखमी झाल्याची घ्घ्ताना आज सकाळी ११.१५ च्या सुमारास झाला. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

नागपूर उमरेड महामार्गवरील पाचगाव बस स्टॉप जवळ उमरेडहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि एस टी.बस यांची धडक झाली. मौजा पाचगाव बस स्टॉप नजिकच्या परिसरात एसटी बस च्या मागून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे ट्रॅव्हल्स वरून नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स एस.टी बसला मागून जोरदार धडक दिली. ट्रॅव्हल्स बस चालकाचा ट्रॅव्हल्स वरून ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या बाजूला एका शेतात जाऊन अडकली. दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami