रत्नागिरी, प्रतिनिधी- विलिनीकरणाच्या मुद्यावरून सुरू झालेला एसटीचा संप चिघळल्यामुळे रत्नागिरी आगाराचे गेल्या तीन महिन्यांचे उत्पन्न थांबले आहे. रत्नागिरी आगारातील एसटीच्या दिवसाला 2 लाख किमी इतक्या फेर्या होऊन त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून साधारण 60 ते 70 लाखांचे उत्पन्न मिळत होते. एसटी बंदमुळे गेली तीन महिने हे उत्पन्न थांबले आहे. एरवी लाखो किलोमीटर फिरणार्या एसटीवर मर्यादा आली असून त्या फक्त 700 ते 800 किमीच फिरत आहेत. या काळात प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा पर्याय आपलासा केल्याने एसटीचा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात तुटला आहे. प्रवासी जोडण्यासाठी महामंडळाने अनेक प्रयत्न केले होते. मात्र आता तुटलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळवणे, हे आमच्यापुढे एक मोठे आव्हान आहे, असे मत एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी व्यक्त केले.