संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

एसबीआयचे डेबिट कार्ड हरवल्यास ‘असे’ करा ब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर ग्राहकांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कार्ड ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सांगण्यात आली आहे. आता आपण त्याबाबतच सविस्तर जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही डेबिट कार्ड हरवल्यास वा चोरीला गेल्यास खात्यातून होणारे गैरव्यवहार टाळू शकता.

तुमचं एसबीआय डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे तुम्ही एसबीआयच्या 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर बँक एक्झिक्युटिव्ह तुम्हाला काही काही सूचना देतील. त्या फॉलो करून तुम्ही तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता.

तसेच तुम्ही नेट बँकिंगची मदत घेऊ शकता. त्यासाठी आपलं युजरनेम आणि पासवर्डवापरून www.onlinesbi.com या वेबसाईटवर लॉग इन करा. मग ‘ई सर्व्हिसेस’ टॅबवर गेल्यानंतर ‘एटीएम कार्ड सर्व्हिसेस’ या पर्यायातील ‘ब्‍लॉक एटीएम कार्ड’ हा उपपर्याय निवडा. त्यानंतर हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या डेबिट कार्डसोबत लिंक असलेलं अकाउंट सिलेक्ट करा. त्याठिकाणी सर्व अॅक्टिव्ह आणि ब्‍लॉक केलेले कार्ड दिसतील. तुम्हाला कार्डचे पहले चार आणि शेवटचे चार डिजिट दिसतील. त्यापैकी ब्‍लॉक करावयाचं कार्ड आणि ब्‍लॉक करण्याचे कारण सिलेक्‍ट करा. ड्रॉपडाउन मेनूचा वापर करून कारण सिलेक्‍ट करता येऊ शकतं. त्यानंतर ‘सबमिट’ऑप्शनवर क्लिक करा.

कार्ड ब्‍लॉक झाल्यानंतर इंटरनेट फॅसिलिटी वापरून ते अनब्‍लॉक करता येत नाही. त्यामुळे तुम्ही भरलेल्या डिटेल्‍स व्हेरिफाय आणि कम्फर्म करा. ऑथेंटिकेशन पद्धत सिलेक्ट करा. हा एसएमएसद्वारे ओटीपी किंवा प्रोफाइल पासवर्ड असू शकतो. गरजेच्या बॉक्‍समध्ये ओटीपी किंवा प्रोफाइल पासवर्ड टाईप करा. त्यानंतर पुन्हा ‘कन्‍फर्म’ ऑप्शनवर क्लिक करा. कार्ड ब्लॉक झाल्यानंतर तुम्हाला तिकीट नंबरसह एक मेसेज मिळेल. फ्युचर रेफरन्ससाठी तो जपून ठेवा.

त्याचबरोबर एसएमएस पाठवूनसुद्धा तुम्ही एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता. त्यासाठी तुम्हाला 567676 वर BLOCK XXXX असा मेसेज पाठवावा लागेल. येथे XXXX डेबिट कार्ड क्रमांकाचे शेवटचे चार अंक द्यावे लागतील. या पर्यायाचा वापर करण्यासाठी बँकेत रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच एसएमएस पाठवावा लागेल. बँकेला तुमचा एसएमएस मिळाल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन एसएमएस पाठवला जाईल. या एसएमएस अलर्टमध्ये तिकीट क्रमांक, ब्लॉक करण्याची तारीख आणि वेळ दिलेली असेल.

महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊनसुद्धा कार्ड ब्लॉक करू शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami