संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

एसी लोकलबाबत उद्या मुंब्रा स्थानकावर बैठक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे – साध्या लोकलच्या फेऱ्या कमी करून एसी लोकल फेऱ्या वाढवल्याने सर्वसामान्य गरीब प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्याचा फटका मुंब्रा, कळवा, दिवा परिसरातील कष्टकऱ्यांना बसत आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणि त्याच्याविरुद्धच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या रविवारी ४ सप्टेंबरला दुपारी मुंब्रा रेल्वे स्थानकात प्रवाशांची बैठक आयोजित केली आहे. त्यात आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
गरीब कष्टकरी माणूस एसी लोकलच्या विरोधात भांडत नाही. तो स्वतःची आर्थिक परिस्थिती ओळखून जगता येईल की नाही याचा विचार करून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. जिवंत राहण्यासाठी झगडत आहे. अशा ९० टक्के साध्या लोकलच्या गरीब प्रवाशांसाठी मी संघर्ष करतोय. सर्वसामान्य गरीब कष्टकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यामुळे एसी लोकल हवी असलेली १० टक्के मंडळी माझ्या विरोधात गरळ ओकत आहे. त्याने मला फरक पडणार नाही. एसी लोकल हव्या तेवढ्या वाढवा. पण त्यासाठी साध्या लोकल रद्द करू नका. त्यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना एसी लोकल परवडत नाही. कळवा, मुंब्रा, दिवा येथील प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. त्यांची गैरसोय होत आहे. म्हणून रविवारी कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकात प्रवाशांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami