संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

एसी लोकलसेवा बंद पाडू! जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे- मुंब्रा आणि कळवामधून 3 लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद पाडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी मुंब्रा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसोबत घेतलेल्या बैठकीतून रेल्वे प्रशासनाला दिला.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रेल्वे प्रवाशांनो एक व्हा, आम्ही राजकीय रंग देत नाही, कुठेही पक्षाच्या नावाने काम करत नाही. हा जनतेचा आवाज आहे,
लोक सांगत होते की, एसी लोकल बंद करा. आम्हाला अर्धातास उशीर होत आहे. अर्धातास जर माणूस उशिरा पोहोचला तर त्याची सुट्टी लावली जातेय. उशिरा कामावरती पोहल्यावर खाडा होतो. मग या नागरिकांचा पगार कोण देणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितीत केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami