संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

ऐन लगीनसराईच्या हंगामात
सोन्या-चांदीच्या दरात घसरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ऐन लगीनसराईच्या हंगामात सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. आज बुधवारी २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात १३६ रुपयांची घसरण नोंदवली गेली.विशेष बाब सुद्धा मंगळवारी सोन्याचे भाव १०१ रुपयांनी कमी झाले होते.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. बुधवारी चांदीचा भाव प्रतिकिलो ५२० रुपयांनी कमी झाला होता.भारतात सध्या सगळीकडे लग्नाचा हंगाम सुरू आहे.त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करत आहेत.येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.आज बुधवारी सराफा बाजारात सोन्याचा भावात १३६ रुपयांची घसरण झाल्याने २४ कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा भाव प्रतितोळा ५२ हजार ८३७ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ४८ हजार २८७ इतका होता. आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. सराफा बाजार उघडताच चांदीचे दर तब्बल ५२० रुपयांनी कमी झाले.सध्या भारतीय सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर ६१ हजार २९५ इतका झाला आहे. येत्या काही दिवसांत चांदीचा भाव प्रतिकिलो ६५ हजारांवर पोहचेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami