संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाच्या
कामासाठी २ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – नवी मुंबई पालिका परिसरातील ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाच्या पहील्या भागतील उन्नत मार्गामधील मुंब्रा शिळफाटा दरम्यान राज्यमहामार्ग क्रमांक ४ ओलांडण्यासाठी ६३ मीटर लांबीचे स्टीलचे ८ गर्डर उभारण्यात येणार आहेत.त्यामुळे आज सोमवार १८ आणि रविवार २५ डिसेंबर या दोन दिवशी विशेष ट्रॅफिक ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.या आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
या गर्डरच्या उभारणीसाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून मर्यादीत वेळेत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.हा प्रकल्प पूर्णतः उन्नत असून भारत बिजली जवळ या भागात उड्डाणपुलाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी असेल. तसेच या ८ गर्डरचे एकूण वजन अंदाजीत ६५० मेट्रिक टन इतके आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाचे काम विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेले असून या प्रकल्पाची लांबी १२.३किमी इतकी आहे.तसेच हा प्रकल्प ३ भागांत प्रगतीपथावर आहे. पहिल्या ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान एकूण ४ गर्डर तर दुसऱ्या ब्लॉकमध्ये उर्वरित ४ अशा प्रकारे एकूण ८ गर्डर उभारले जाणार आहेत. या कामामध्ये क्रेनच्या सहाय्याने २ गर्डर एकाचवेळी उचलले जातील. या दोन गर्डरचे एकत्रित वजन सुमारे १६० ते १९० मेट्रिक टन इतके असेल. या गर्डर उभारणी साठी ए -७५० टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेन वापरण्यात, तसेच डायाफ्राम जोडणीसाठी २ अतिरिक्त क्रेन वापरल्या जातील. पहिला ब्लॉक १८ डिसेंबरच्या रात्री ००:०१ वाजल्यापासून २३:५९ वाजेपर्यंत आणि दुसरा २५ डिसेंबरच्या रात्री ००:०१ पासून २३:५९ वाजेपर्यंत पर्यंत असणार आहे. त्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महामार्ग क्र. ४ वर मुंब्रा शिळफाटा दरम्यान ची अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून ती इतर पर्यायी मार्गांनी वळविली जाईल. तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून इतर वाहतूक उड्डाणपूला खालून सुरू ठेवण्यात येईल,अशी माहिती एमएमआरडीए,महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami