सॅनफ्रान्सिस्को- गेल्या काही महिन्यांपासून जागतिक मंदीच्या परिस्थितीमुळे अनेक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटाच लावला आहे. मायक्रोसॉफ्ट,गुगल आणि अमेझॉन पाठोपाठ आता ऑक्टा कंपनीही आपल्या टक्के कर्मचार्यांना घरचा रस्ता दाखविणार आहे. सॉफ्टवेअर कंपनी ऑक्टा इन्क.ने आपल्या ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड मॅककिनन यांनी या नोकर कपातीबाबत खुलासा केला आहे.त्यांनी सांगितले की,ओक्टा आपल्या पाच टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. गुरुवारी कर्मचार्यांना एका ईद्वारे याबाबत माहिती देण्यात आली,तसेच कंपनीच्या कॉर्पोरेट ब्लॉगवर देखील याबाबत पोस्ट केले गेले होते. ऑक्टा आपल्या पाच टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. गुरुवारी कर्मचार्यांना एका ईद्वारे याबाबत माहिती देण्यात आली, तसेच कंपनीच्या कॉर्पोरेट ब्लॉगवर देखील याबाबत पोस्ट केले गेले होते.