मुंबई : ऑटो रिक्षामध्ये असलेल्या मधल्या आरशामुळे महिलांनी असुरक्षित वाटत असलेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यामुळे हा आरसा काढून टाका अशी मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. ऑटो रिक्षात मधला आरसा खरच गरजेचा आहे का? ऑटो रिक्षाला सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंनी आरसे असतानाही मधला आरसा कशासाठी? त्याबरोबर मधल्या आरशामुळे महिलांना अवघडल्यासारखे होते अशाही तक्रारी होत्या.त्यामुळे वॉचडॉग संस्थेने याबाबत मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.मात्र प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा आरसा असल्याच्या प्रतिक्रिया काही रिक्षाचालकांनी दिल्या आहेत.यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.