संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

‘ऑपरेशन गंगा’वर राजकारण नको; परराष्ट्र राज्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने जे ऑपरेशन गंगा सुरु केले आहे, त्यावर विरोधकांनी राजकारण करू नये असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी विरोधकांना आवाहन केले आहे.

मुरलीधरन हे पुण्यात आले होते. यावेळी ऑपरेशन गंगावरून काही विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा आणि ऑपरेशन गंगाचा काहीही संबंध नाही. सुमारे २० हजार भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी ४ हजार लोक २४ तारखेच्या पूर्वीच भारतात आले आहेत. कालपर्यंत दोन हजारपेक्षा अधिक लोक भारतात परतले. बाकीच्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पोलंड, हंगेरी आणि युक्रेनच्या शेजारी देशांच्या मदतीने भारतीय नागरिकांना परत आणले जात आहे. रशिया युक्रेन युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या जीवाला धोका होता. म्हणून त्यांना युद्ध पातळीवर भारतात आणले जात आहे. त्याचे विरोधकांनी राजकारण करू नये असे परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami