संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

ऑफलाईन परीक्षेच्या भितीने दहावीच्या मुलीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बदलापूर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने पुन्हा एकदा ऑफलाईन परीक्षा घेण्याचे जाहीर होताच विद्यार्थी नाराज झाले आहेत. त्यातचून बदलापूर येथे राहणाऱ्या एका विद्यार्थीनीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे.

बदलापूर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थीनीने स्वचःचे अपहरण झाल्याचा बनाव केला होता. बदलापूर येथील चार जणांनी आपलं अपहरण केल्याची माहिती आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर या अपरहणकर्त्यांनी आपली सुटका केली असून सध्या परळमध्ये असल्याचंही तिने सांगितले. त्यामुळे वडिलांनी तत्काळ दादर पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली. ही घटना बदलापूर येथे घडली असल्याने हे प्रकरण बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले.

वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरचे काही सीसीटीव्ह फुटेजही तपासले. मात्र, मुलीने वर्णन केल्याप्रमाणे काहीच आढळले नाही. त्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. पोलिसांनी संबंधित मुलीची अधिक चौकशी केली असता तिने या अपहरणाचा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच ऑफलाईन परीक्षेच्या भीतीनं आपण असं केल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami