ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये शक्तिशाली भूकंप; अनेक इमारती कोसळल्या

earthquake, fracture, asphalt-1665892.jpg
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न शहर बुधवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले. ६.० रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मेलबर्न शहरातील अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक इमारती हादरल्या आणि भिंती कोसळल्या. अचानक झालेल्या भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. हा भूकंप एवढा जबरदस्त होता की, शेकडो किलोमीटर दूरपर्यंत त्याचा परिणाम जाणवला.

यूएस जिओलॉजिकलतर्फे मिळालेल्या माहितीनुसार, ही तीव्रता ५.८ नोंदवली होती, जी नंतर ५.९ झाली. माहितीनुसार, त्याची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती. शक्तिशाली भूकंपानंतर मेलबर्नच्या चॅपल स्ट्रीटवर ढिगारा पसरला. हा परिसर येथील लोकप्रिय खरेदी क्षेत्र आहे. मात्र भूकंपांनंतर रस्त्यांवरील इमारतींमधून विटा आणि दगड पडू लागले. मेलबर्नमधील एका कॅफेचे मालक जुम फिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंप होताच ते बाहेर पडले आणि रस्त्याच्या दिशेने पळाले. संपूर्ण इमारत थरथर कापत होती. सर्व खिडक्या, आरसे थरथरत होते. जणू एक शक्तिशाली लाट येत होती. ते म्हणाले, ‘मला यापूर्वी असे कधी वाटले नव्हते इतके भयंकर दृश्य होतेच शिवाय भीतिदायकही होते.’ऑस्ट्रेलियाचा आग्नेय भाग भूकंपासाठी ओळखला जात नाही. या भागात भूकंप अत्यंत दुर्मिळ आहेत. ८००च्या दशकात येथे एक शक्तिशाली भूकंप झाला होता, त्यानंतर कोणत्याही मोठ्या भूकंपामुळे येथे नुकसान झाले नाही. १० ते २० वर्षांत एकदा भूकंप होतो.२०१२ मध्ये अखेरच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Close Bitnami banner
Bitnami