संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

ओएनजीसीच्या कर्मचार्‍यांचा
पवन हंस हेलिकॉप्टरवर बहिष्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)च्या कर्मचार्‍यांनी सरकारी मालकीच्या पवन हंस हेलिकॉप्टरवर बहिष्कार घातला आहे. त्यातून प्रवास करण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्याचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ओएनजीसीच्या 7 कर्मचार्‍यांना घेऊन जात असलेल्या पवन हंस हेलिकॉप्टरचे मंगळवारी ओएनजीसी ऑफशोर सागर किरणपासून 2 किमी अंतरावर अरबी समुद्रात तातडीने लँडिंग केले होते. दोन पायलटसह त्यात एकूण 9 जण होते. त्यातील 6 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र ओएनजीसीचे 2 कर्मचारी आणि एक कंत्राटी कामगार असा तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या हेलिकॉप्टरच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाल्याने ओएनजीसीचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी त्यावर बहिष्कार घातला आहे. या हेलिकॉफ्टरमधून प्रवास करण्यास नकार दिला आहे. पवन हंसच्या हेलिकॉप्टरचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांची ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे. त्यानुसार रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडिया ऑडिट करणार आहे. ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकॉर्प लिमिटेड आणि हेलिगो चार्टर्स लिमिटेड या दोन खासगी कंपन्या सेवा देत आहेत. मंगळवारच्या दुर्घटनेनंतर ओएनजीसी कर्मचार्‍यांनी बुधवारपासून पवन हंसवर बहिष्कार घातला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami