संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

ओडीशातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीजेडीची तब्बल २४९ जागांवर आघाडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भुवनेश्वर – ओडीशातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल पक्षाने भाजपला चारी मुंड्या चीत केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीजेडीने ३१५ जिल्हा परिषद जागांपैकी २४९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ३२ आणि कॉंग्रेस १३ जागांवर पुढे असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काल सांगितले.

कोरोना नियमांचे पालन करत काल विविध जिल्हा मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. काल ३०७ जागांसाठी तर आज २२९ जागांवरील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव आर.एन.साहू यांनी सांगितले की, पीठासीन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या मतपत्रिकेत तफावत आढळल्यास त्या मतपत्रिकांची दखल घेतली जाईल. ही मतमोजणी आज आणि उद्या चालणार आहे. राज्यात पंचायत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यावेळी साधारण ७० टक्के मतदान झाले आहे. सर्व टप्प्यातील ४५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami