संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

ओबीसी आरक्षणाची चिंता नको पंतप्रधान मोदी स्वतःच ओबीसी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच ओबीसी आहेत. आणि सर्वाधिक ओबीसी मंत्री बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे विरोधकांनी ओबीसींची चिंता करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे . दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ओबीसींच्या मेळाव्यात आज बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या 30 वर्षांपासून मी राजकारणात आहे. आणि मला ओबीसी बांधणीत घडवले आहे. मी ज्या नागपूरमधून निवडून येतो त्या मतदारसंघात ओबीसींची संख्या मोठी आहे.

ओबीसींची एकजूट करून त्यांचा आवाज बुलंद करणारे डॉ. बबनराव तायवाडे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत. त्यांच्या विचारांचे सर्वांनीच समर्थन करायला हवे, असेही फडणवीस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत, त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही केले. मी मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय सुरू केले होते. 2014 ते 2022 या कालावधीत आम्ही ओबीसींसाठी 22 मोठे निर्णय घेतले. ओबीसींना शिक्षण, नोकरी, छात्रावास, विदेशी शिष्यवृत्ती, आय.ए.एस. प्रशिक्षण आदींना आमच्या सरकारने मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्रात शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार ओबीसींच्या हिताचे रक्षण करील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आमचे सरकार आल्यास मी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देईन असे मी सांगितले होते. आणि सरकारमध्ये येताच ते करून दाखवले. काही विरोधक पंतप्रधान मोदींच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, पंतप्रधान स्वतःच ओबीसी असल्याने विरोधकांनी ओबीसींबाबत चिंता करू नये. ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील 40 मंत्री ओबीसी आहेत, असेही या मेळाव्यात त्यांनी सांगितले. या मेळाव्याला देशभरातून हजारोंच्या संख्येने ओबीसी उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami