संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

औरंगजेबाच्या नावावरून वाद पेटला! सिल्लोडमध्ये दोन गट आमने-सामने

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – जिल्ह्यात औरंगजेबाच्या नावावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रस्त्यावरील चौकांच्या नामकरणावरून दोन गटाकडून आमने सामने येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.ही घटना तालुक्यातील शिवणा येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.एका गटाने चौकाला औरंगजेव नाव देण्याचा प्रस्ताव आणला, तर दुसऱ्या गटाने या नावाला विरोध केला.दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवना ग्रामपंचायतीने एका चौकाला औरंगजेबाचे नाव देण्याचा ठराव घेतला. त्यानंतर ग्रामपंचायतीने चौकात औरंगजेब नावाची पाटी लावण्यास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील मुख्य बाजारपेठेत रस्ता दुभाजकांमध्ये रात्रीच्या विना मस्कराच्या पाट्या सिमेंटमध्ये टाकून उभ्या केल्याचे दिसून आले. त्यासोबत ग्रामपंचायतीच्या ठरावाची नक्कल आणि ना हरकत प्रमाणपत्र ही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ग्रामपंचायत समोर बाहेर मोठा जमाव जमला. त्यामुळे पोलिसांना पाचरण करण्यात आले. यावेळी अजिंठा बुलढाणा राज्य मार्गावर रात्री आठच्या सुमारास दोन्ही बाजूने दोन जमावाने घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. त्यासोबत काही टोळक्याने घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी फोडल्याने नागरिक घराबाहेर आले.त्यावेळी या टोळक्यांनी पळ काढला. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami